0
4
8
2
8
6
खरा मित्र
किती जणांना लावले फोन,
कित्येकांना केली विनवणी…
धावून आले कुणीच नाही,
सांगून गेलेत अडचणी.
कधी येता वादळे संकटे,
उभा नसतो कुणी संगती…
तेथे मात्र जमले असते,
जिथे पंचपक्वान पंगती.
आज असो गरिब श्रीमंत,
उद्या नसेल त्या परिस्थितीत…
झाले कित्येक राजाचे रंक,
आणि राजे मिळले मातीत
श्रीमंतीच्या सोबतीला कैक,
घालती दंडवत प्रणाम…
गरीबांचा घृणा तिरस्कार,
करून करती बदनाम
तोच समजावा खरा मित्र,
जो धावतोय संकट वेळी …
‘सुधाकरा’ बाकी संधीसाधू,
खेळ खेळती खेळाच्या खेळी…
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर नागपूर
========
0
4
8
2
8
6



