
0
5
7
8
9
8
काही विचारू नका
बेरोजगार युवकाहाती
सट्टेबाजीचे पत्ते का?
चकचकीत फुटपाथवर
भिकाऱ्यांचे जथ्थे का?
गगनाला भिडले,
का सोन्याचे भाव?
विद्यार्थ्याच्या भविष्याशी
कसा खेळला कुणी राव?
कुणब्याच्या दाण्याला
का मिळेना किंमत?
मनिपूरवर बोलायची
का कुणात नाही हिंमत?
हे प्रश्न घेती जनमानसी
फेर धरूनी ठेका..!!
नेत्यांना मात्र इथल्या
काही विचारू नका..!!
गेचूळ सारे खुर्चीचे हे
जन प्रश्नाची तमा ना मुळी.!
चला जागे होऊन आता
कापून काढू यांची जडी.
वनिता गभणे
आसगाव, जि.भंडारा
========
0
5
7
8
9
8



