Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

कवी तुषार पालखे संपादित ‘आसक्ती’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा थाटात

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

0 4 8 2 8 6

कवी तुषार पालखे संपादित ‘आसक्ती’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा थाटात

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

पुणे: भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तसेच राजयुवा प्रकाशन आयोजित राज्यस्तरीय कुसुमाग्रज कवी संमेलन आयोजित केले होते तसेच राजयुवा प्रकाशनामार्फत चार प्रतिनिधिक पुस्तकांचा समावेश होता. त्यात युवा कवी तुषार पालखे यांनी संपादित केलेल्या “आसक्ती” या प्रतिनिधिक कविता संग्रहाचे प्रकाशन पाठ्यपुस्तकातील कवी वैभव धर्माधिकारी,विस्तार अधिकारी श्रीमती सुभा लोंढे,वनविभाग अधिकारी मा.लक्ष्मण शिंदे,भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष विशाल शिरसट, तसेच कार्याध्यक्षा मा.शिल्पा मुसळे व राजयुवा प्रकाशनाचे प्रकाशक मा.गौरव पुंडे या आदी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळा पार पडला.

युवा कवी तुषार पालखे आसक्ती या प्रतिनिधिक पुस्तकाचे संपादक असून त्यांनी तब्बल ७० युवा कवींना एकत्रित करून हे पुस्तक संपादित केले. त्यांनी आपल्या मनोगतातून कवी वर्गाची मने जिंकून आपल्या आसक्ती मधून प्रेम ,भावना, विश्वास, आदर , काळजी अशी अनेक नात्यांची गुफण करून घेतली आहे.तसेच प्रेम हे अगदी सरळ सोप्या भाषेत सहज व्यक्त केले आहे.

प्रेमात ,ध्येयात,स्वतःच्या स्वप्नासाठी स्वप्नपूर्तीच्या मार्गावर स्वतःला पूर्णपणे सर्वस्व पणाला लावलेल्या प्रत्येक ध्येयवेड्या,प्रेमवेड्या, स्वपनवेद्या,
संघर्षवेड्या अशा प्रत्येक व्यक्तीस यांनी आसक्तीस अर्पण करून आपल्या भावना अंतरमनाने व्यक्त केल्या आहेत. यावेळी ४० निमंत्रित कवींचे कवी संमेलन देखील पार पडले.

या कार्यक्रमाचे निवेदन श्रीशैल सुतार तसेच सारिका सासवडे यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन योगेश हरणे,पल्लवी पवार , मयुरी लायगुडे,संगम उबाळे, गौरव पुंडे, ज्योती भंडारी यांनी केले.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे