0
4
8
2
9
3
पैशाची कदर
जिथे तिथे होत आहे,
मानसाचा अनादर…
फक्त आणि फक्त होते,
येथे ‘पैशाची कदर’..१
किती करा प्रेम तुम्ही,
किती लावा जीव जरी…
निर्धनाच्या संगतीला,
म्हणे राम कृष्ण हरी…२
खणाणता पैसा ध्वनी,
झोंबतात कुणी कुणी…
खाली खिशा खाली हात,
पाहे कुणी ना ढुंकूनी…३
गुणवान विद्वानाचे,
मोल नसे येथे काही…
‘सुधाकरा’ पैसा मागे,
फिरे जग दिशा दाही…
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर नागपूर
======
0
4
8
2
9
3



