Breaking
ई-पेपरकविताधाराशिवमराठवाडासाहित्यगंध

ह.भ.प.अजित (बंडू) गुरुजी

डॉ. ज्ञानेश्वर माशाळकर बेडगा, जि. धाराशिव

0 5 3 6 4 3

ह.भ.प.अजित (बंडू) गुरुजी

सेवा हीच तुमची पूजा
हे जगालाच दाखवत राहता तुम्ही…
श्री क्षेत्र अचलबेट देवस्थानचे निष्ठावंत सेवकरी तुम्ही,
सद्गुरू उज्वलानंद महाराजांच्या
कृपाछायेखाली वाढलेले तुम्ही,
सद्गुरू औसेकर महाराज आणि
सद्गुरू महेश महाराजांचा आशिर्वाद लाभलेले,
गुरूबंधू म्हणून आमच्या आयुष्यात
देवाने दिलेली अनमोल देणगी तुम्ही…
आज वाढदिवस तुमचा…
पण मन आमचं रडतंय,
कारण तुमच्यासारखा माणूस लाभणं
हेच आमचं भाग्य ठरतंय…
कधी नकळत दुखावलो असेल,
तर क्षमा करा आम्हाला,
तुमच्या प्रेमाशिवाय अर्थ नाही,
आमच्या या जीवनाला…
तुम्ही व्यक्ती नाही…
आमची जिवंत श्रद्धा आहात,
असेच रहा तुम्ही… सर्वांसाठी धावून येणारे,
आणि आमच्या जीवनातील खरे
“देवमाणूस” बनून सदैव राहणारे

डॉ. ज्ञानेश्वर माशाळकर
बेडगा, जि. धाराशिव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 6 4 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे