पवनी येथे गट साधन केंद्रातर्फे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
शिक्षकांनी घेतला कवी संमेलनात सहभाग
पवनी येथे गट साधन केंद्रातर्फे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
शिक्षकांनी घेतला कवी संमेलनात सहभाग
पवनी शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
मराठी भाषा गौरव दिन… पुष्प पहिले!
भंडारा/पवनी: (दि २७) कविवर्य, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम न.प.लाल बहाद्दुर शास्त्री केंद्रीय प्राथमिक शाळा पवनी येथे आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी संजयकुमार वासनिक साहेब तथा प्रमुख अतिथी राज्य पुरस्कृत शिक्षक तथा पत्रकार अशोक गिरी,केंद्र प्रमुख मानप्रकाश येळेकर,प्रमोद खेडीकर,चंद्रभान पाटील,साधन व्यक्ती डॉ.मुरलीधर रेहपाडे आदींची उपस्थिती होती.
सर्वप्रथम कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी संजयकुमार वासनिक साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मराठी भाषेचे संवर्धन काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.सुत्रसंचलन साधन व्यक्ती मंजुषा दलाल यांनी केले तर आभार साधन व्यक्ती दिपाली बोरीकर यांनी मानले.
पुष्प दुसरे:-
पवनी तालुक्यातील सर्व केंद्रातील नवोदित कवी, कथाकार शिक्षक यांनी सहभागी होऊन
काव्य, कथा सादरीकरण केले.



