ऑल इंडिया समता सैनिक दलाचे तृतीय राज्य अधिवेशन अमरावती येथे संपन्न
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
ऑल इंडिया समता सैनिक दलाचे तृतीय राज्य अधिवेशन अमरावती येथे संपन्न
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अमरावती (दि १९) :ऑल इंडिया समता सैनिक दल द्वारा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन, भीमटेकडी परिसर अमरावती येथे राज्याचे तृतीय अधिवेशन घेण्यात आले. समता सैनिकांचे पथसंचलन भीमटेकडी परिसरातून झाले तेव्हा आजूबाजूचा समुदाय थक्क होऊन गेला. अणूरेणूत तरतरी आणणारी सलामी झाल्यानंतर मुख्य अधीवेशनाला सुरुवात झाली.
अधिवेशानाचे एकूण पाच सत्र झाले ज्यात पहील्या दुसर्या चौथ्या आणि पाचव्या सत्राचे अध्यक्षस्थानी सैनिक कांतीलालजी भांगे अध्यक्ष महाराष्ट्र युनिट यांनी भुषविले. तिसऱ्या सत्राचे अध्यक्षपद सैनिक ज्योती ताई भैसारे अध्यक्ष महाराष्ट्र महीला विंग यांनी भुषविले. दिवसभराच्या सत्रात बाबासाहेबांचे विचार आणि ऑल इंडिया समता सैनिक दल महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात कसे पोहोचविता येईल यर विचारमंथन झाले. वक्त्यांनी आपल्या भाषणातून समता स्वातंत्र्य बंधूता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर जोर दिला. प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या अध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्याचा आढावा सादर केला. सैनिकांचे आर्थिक सामाजिक प्रगतीवर भर देण्यात आला.
आदरणीय एच आर गोयल अध्यक्ष राष्ट्रीय कार्यकारिणी, आदरणीय अशोक शेंडे, जनरल सेक्रेटरी, आदरणीय डॉ. हिरेश नगराळे, पुर्व डीन, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, डाॅ. नितीन कोली निर्देशक, संत गाडगे महाराज अमरावती विश्वविद्यालय,
डॉ. संजय गजभिये, बौद्धिक प्रमुख AISSD, प्रोफेसर डॉ. भूषण रामटेके, बौद्धिक प्रमुख महाराष्ट्र, सैनिक सौरस घोटेकर सहसचिव महाराष्ट्र यांनी प्रास्ताविक केले. सैनिक उज्वला उके, सचिव महीला विंग महाराष्ट्र, सैनिक विद्द्या मून, सदस्य महाराष्ट्र, सैनिक उज्वला इंगोले, सदस्य महाराष्ट्र, यांनी सत्र संचालन केले.
सैनिक भाऊराव राजदीप, क्षत्रिय सचीव, पश्चिम भारत, आदरणीय डॉ. संतोष बी बंन्सोड, विभागप्रमुख (इति.) नारायणराव महाराणा महाविद्यालय बडनेरा, सैनिक प्रशिक आनंद सदस्य यांनी बौद्धिक मार्गदर्शन केले. राज्याची नविन कार्यकारिणी घोषित करण्यात आली ज्यात अध्यक्ष कांतीलालजी भांगे, उपाध्यक्ष सुरेन्द्र भैसारे सचीव….. कोशाध्यक्ष बी एन वासे यांना करण्यात आले. महीला विंग कार्यकारिणी अध्यक्ष रंजनाताई वासे, उपाध्यक्ष उज्वलाताई ऊके, सचीव सविता धमगाये, कोशाध्यक्ष अनिता बनकर आणि बौद्धिक प्रमुख ज्योती ताई भैसारे यांना करण्यात आले. अशाप्रकारे तृतीय अधिवेशन संपन्न झाले.



