बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवास मध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवास मध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: बुधवार दि. २९ जुलै २०२६ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात गुरुपौर्णिमेचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
सकाळ सत्रात इ. ११ वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच दुपार सत्रात इ.५ वी ते इ.१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. दोन्ही सत्रात सर्व प्रथम महर्षी व्यासांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर विशाल पाटील सर व यतिश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनातून घडलेल्या विद्यार्थीनींनी अतिशय सुंदररीत्या गुरु वंदना सादर केली.
त्यानंतर विद्यार्थीनींनी मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांचे व सर्व शिक्षकांचे तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे औक्षण केले आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत सन्मान केला. सकाळ सत्रात कैलास शिकारे सर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्तविकातून व सुत्रसंचलनातून गुरुपौर्णिमा व गुरू – शिष्य परंपरे विषयी माहीती सांगितली. दत्तात्रय अहिरे सर व नितिन शिंदे सर यांनी आपल्या मनोगतातून गुरूंची महती सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दत्तात्रय अहिरे सर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नितिन शिंदे सर यांनी केले.
दुपार सत्रात मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी आपल्या प्रास्तविकातून गुरुपौर्णिमा व गुरु – शिष्य परंपरे विषयी माहिती सांगितली. अजित नाईक सर यांनी परीक्षक म्हणून मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी केले तर आभार प्रदर्शन आशिष राणे सर यांनी केले.
दोन्ही सत्रात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला व अतिशय सुंदर भाषणे करून गुरुं विषयी कृतज्ञता व्यक्त केली. दुपार सत्रात पल्लवी पाटील मॕडम, दिव्या भगत मॕडम व अजित नाईक सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:
*इ. ११वी व इ. १२ वी गट*–
*प्रथम क्रमांक-* पायल संजय म्हात्रे [ इ.११ वी कला ]
*द्वितीय क्रमांक-* तपस्या रविंद्र वाघ [ इ.१२ वी वाणिज्य ]
*तृतीय क्रमांक -* वंशिका विरेंद्र शितप [ इ.११ वी वाणिज्य ]
*इ.९ वी, १० वी गट*–
*प्रथम क्रमांक*– दक्ष दत्तात्रेय घरत [ इ. ९ वी अ ]
*द्वितीय क्रमांक*– रक्षिता अमरेश म्हात्रे [ इ. १० वी अ ]
*इ.७ वी, इ. ८ वी गट*–
*प्रथम क्रमांक*– रक्षिता किशोर भगत [ इ. ७ वी ]
*द्वितीय क्रमांक*– साईशा संदेश राणे [ इ.७ वी ]
*इ.५ वी, इ. ६ वी गट*–
*प्रथम क्रमांक*– पूर्वा परमेश्वर सोन्नर [ इ. ६ वी ]
*द्वितीय क्रमांक*– साची शैलेश पूरो [ इ. ६ वी ]
दोन्ही सत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी यतिश शिंदे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.



