ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
सावर रे मना
पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे
0
4
8
2
9
3
सावर रे मना
सावर रे मना आता
नको गुंतू मोहजाळी
तूच तुझा सोबती
कोण देणार हाळी
तू गुंतला संसारी
केलेस कष्ट अपार
नाही मदत कोणाची
नसे कोणाचा आधार
दिलेस आंदण सुखाचे
सर्वांना एकत्र करून
दूर झाले सारे फक्त
तुला गृहित धरून
सावर स्वतःस आता
ऐक रे माझ्या मना
तुझ्या सहनशीलतेच्या
सांग उरतील का खुणा
कर स्वतंत्र विचार
जरा हो तू वेगळा
जगून बघ स्वतःसाठी
घे श्वास मोकळा
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे
0
4
8
2
9
3



