0
4
8
2
9
3
आरक्षण
भीमामुळे तुम्हा अम्हा लाभले आरक्षण।
पण उपकार बाबाचे ,विसरले सारेजण ।।धृ।।
कंगाल सारे होते ,त्या गुलामीत अन्यायी।
जातीपाती धर्मांधतेने ,छळले ठायी ठायी।।
तोडूनी रुढी परंपरा दिधले माणूसपण//१//
फक्त उध्दार मानवाचा संकल्प ईच्छा होती।
म्हणूनी जगासमोर ती जाळली मनुस्मृती।।
निर्भय झाली भगिनी मातेलाही संरक्षण//२//
उन्नती माणसाची खरी शिक्षण विज्ञानाने।
मानवतावादी होतील, जगेल अभिमानाने।।
घटना लिहून दिली ,भारताला समर्पण//३//
असा महामानव दुजा कोणी जन्मला नाही।
राम क्रुष्ण ब्रम्हांपरी अवतार घेतला नाही।।
पोती पुराण थोतांड जना सांगतो गोवर्धन//४//
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा. जि यवतमाळ
0
4
8
2
9
3



