
0
4
0
9
0
3
श्वासाची किंमत
जे असते सहज उपलब्ध
कळते का कधी त्याची किंमत
निसटून जातो काळ हातातून
परत आणून दाखवा हिंमत ॥
धन असेल जरी कितीही
श्वासाची किंमत लावून दाखवा
क्षणाक्षणाला मावळत्या श्वासात
पुन्हा प्राण ओतून दाखवा ॥
जिवंत जोपर्यंत श्वास आहे
तोपर्यंत जगण्याची आस आहे
धडधडत्या श्वासात दडलेली
माणसं आपली खास आहे ॥
हे माझे ते माझे
भांडत बसतो आयुष्यभर
हाती काहीच लागत नाही
प्राण निघून गेल्यावर ॥
श्वास म्हणजे चैतन्य
श्वास म्हणजे प्रेम
श्वास म्हणजे अस्तित्व
श्वास म्हणजे नित्यनेम ॥
आयुष्यभर भांडत बसतो
धन संपत्तीसाठी बिचारा
व्हेंटीलेटर लागल्यावर
श्वासाची किंमत विचारा ॥
विझण्यापूर्वी श्वास आपुला
भरभरून प्रेम करावे
थांबली जरी श्वासाची स्पंदने
प्रेमरूपे श्वासात मिसळावे ॥
सरला टाले
राळेगाव यवतमाळ
0
4
0
9
0
3





