Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

डॉ. अविनाश परांजपे यांच्या ‘फिरते मनुजा भोवती दुनिया’ या वास्तव कथासंग्रहाचे अनोखे प्रकाशन

श्री टेकडी गणेश मंदिरात कु.तेजस्वीच्या हस्ते प्रकाशन

0 6 2 7 9 7

डॉ. अविनाश परांजपे यांच्या ‘फिरते मनुजा भोवती दुनिया’ या वास्तव कथासंग्रहाचे अनोखे प्रकाशन

श्री टेकडी गणेश मंदिरात कु.तेजस्वीच्या हस्ते प्रकाशन

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर, (दि १५): शहरातील ज्येष्ठ साहित्यिक, स्तंभलेखक व कथा लेखक डॉ. अविनाश प. परांजपे यांच्या ‘फिरते मनुजा भोवती दुनिया’ या वास्तव कथासंग्रहाचे प्रकाशन दिनांक 15.10.26 गुरुवार रोजी उत्साहात संपन्न झाले.

विशेष म्हणजे कथाकार डॉ. अविनाश परांजपे यांच्या आग्रहानुसार या पुस्तकाचे प्रकाशन त्यांची नात चि. तेजस्वी (छकुली) निलेश भोगले वय केवळ एक वर्ष! हिच्या ‘बाळहस्ते’ करण्यात आले. नागपूर शहरातील प्रसिद्ध श्री टेकडी गणेश मंदिरात गणरायाच्या समोर या शिशुवयापासूनच माझ्या नातीला स्त्रिशक्तीकरणाचे बाळकडू मिळावेत अशी त्यांची इच्छा असल्यामुळे ती पूर्ण करण्यात आली.

नागपूरचे प्रसिद्ध स्तंभलेखक, कथाकार डॉ. अविनाश परांजपे यांच्या लिखाणाबद्दल उपस्थित मान्यवरांनी प्रसंशा केली. तसेच ‘मराठीचे शिलेदार प्रकाशन, नागपूर’चे मुख्य संपादक श्री राहुल पाटील यांची मराठी भाषा संवर्धन करण्याच्या प्रयत्नांना बाप्पा कायम असेच भरगोस यश प्रदान करो अशी प्रार्थना समस्त उपस्थितानी व्यक्त केली.

या अनोख्या प्रकाशन समारंभाचे नागपुरात सर्वत्र कौतुक होत असून, डॉ अविनाश परांजपे यांच्या कथासंग्रहास अनेक मराठी साहित्यिक, वाचक, लेखक अभिनंदनासह शुभेच्छा देत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 7 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे