0
4
0
9
0
3
बहर
आज माझ्या जीवनी
आला आनंदाचा बहर
मुलगी आली जन्माला
वातावरणी हर्षाची लहर
कुस माझी उजळली
लेकीची माता म्हणून
धन्य झाले जीवनात
अंतर्मन गेले आनंदून
माया,ममतेची सावली
मिळाली मज आधार
स्वप्न माझे रंगलेले ते
झाले आज साकार
करेल दोन कुळाचा
उद्धार स्व ममत्वाने
किर्ती पसरेल सर्वत्र
यशाची स्वकर्तृत्वाने
नंदादिपातील ज्योतीसम
तेवणारी जात लेक
करेल उज्वल भविष्य
ठेवूनिया निती नेक
देईन संस्कार आकार
झेप घेण्या उंच आकाशी
सुख दुःख जाणून सर्वांचे
धरेल प्रेमाने हृदयाशी
श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
सदस्या,मराठीचे शिलेदार समूह
0
4
0
9
0
3





