
0
4
0
9
0
3
माझी पाककला ‘पायनॅपल श्रीखंड’
साहित्य: दोन वाटी दहीचक्का,एक छोटा चमचा वेलची पूड,दोन वाट्या बनारसी साखर,एक वाटी पायनॅपल गर,अर्धी वाटी पायनॅपलचे तुकडे, अर्धी वाटी ड्रायफ्रुट्स भरड.
कृती: चक्क्यात साखर, वेलची पूड, पायनॅपल गर घालून चांगले घोटून घ्या.नंतर त्यात ड्रायफ्रुट्स भरड घालून घोटा.आता पायनॅपलचे तुकडे सजावटीसाठी घाला.फ्रीजमध्ये सेट करून गरमागरम पुरी सोबत खायला द्या पायनॅपल श्रीखंड.
वाढप: ही रेसिपी दोन ते तीन व्यक्तींना पुरेल.
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
0
4
0
9
0
3





