वसुधा फाउंडेशन अग्रेसर संस्था
वसुधा वैभव नाईक, पुणे

वसुधा फाउंडेशन अग्रेसर संस्था
वसुधा वैभव नाईक, पुणे
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पुणे (दि ४) : तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल,पुणे आयोजित -तितिक्षा कला साहित्य संमेलन व तितिक्षा दशकपूर्ती सोहळा दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी अक्षर वेल बिल्डींग रामबाग काॅलनी,सदाशिव पेठ येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उदघाटन -अजया,स्वरा जम, समृद्धी संस्कृती आणि चि.रियांश रविंद्र भवार या बालकलाकारांनी केले.तसेच कार्यक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षण महर्षी डाॅ.न.म.जोशी, प्रसिद्ध गझलकार म. भ. चव्हाण,
तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आणि रंगकर्मी प्रिया दामले , रजनी भट, सतीश इंदापूरकर तसेच विश्वसुंदरी डाॅ.प्रचिती पुंडे, डॉ. विश्वगुरू मधुसूदन घाणेकर हजर होते.
याच कार्यक्रमांमध्ये काही संस्थांचा सत्कार केला गेला. त्यामध्ये वसुधा फाउंडेशन म्हणजेच वसुधा नाईक यांचा सत्कार आणि वसुधा फाउंडेशनचा सन्मान केला गेला. वसुधा फाउंडेशनच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. बाकी विविध संस्थांचा सन्मान केला गेला. कवी संमेलन झाले. विविध पुरस्काराचे वितरण झाले.सुप्रसिध्द कवयित्री सुवर्णा जाधव यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले.





