0
4
8
2
8
6
चुकतोय आम्ही
चुकतोय आम्ही रे मनाला जरा वाटावं
स्वार्थी नौटंकीच,दुकान कशाला थाटावं ?
कष्टाच्या कमाईवर फुकट मारतोय ताव
टाळूवरचं लोणी खाण्याची सुटेना रे हाव
चुकतोय आम्ही खोटेपणावर रे भुललो
खोट्या आश्वासनांवर आम्ही रे झुललो
सत्ता व संपत्तीची नशा डोक्यात रे शिरली
विवस्त्र होता लबाडी फासे उलटी फिरली
चुकतोय आम्ही कैवारी समजून रे फसलो
परिवर्तनाच्या आशेनं मूग गिळून बसलो
संविधानाची घेतो शपथ फाडेन तुझा मुखवटा
चुकतोय आम्ही लबाडांचा पाळतो दुखवटा
सत्तापिपासूंनो जाणा संविधानाची शक्ती
भिमसैनिक मी उघडी पाडेन रे अंधभक्ती
क्रांतीसूर्याच्या विचारांचा मी रे कट्टर पाईक
धम्मचक्र फिरता पळाले धर्मांध धंदेवाईक
संग्राम कुमठेकर
जि.लातूर
0
4
8
2
8
6



