Breaking
आरोग्य व शिक्षणपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेच्या वतीने ‘संविधान दिन’ साजरा

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

0 4 8 2 9 3

भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेच्या वतीने ‘संविधान दिन’ साजरा

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

पुणे,दि.२७(प्रतिनिधी) : भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ असून ते भारतीय जनतेस अर्पण केलेले आहे; आणि हेच त्याचे वैशिष्ट्य आहे, म्हणून प्रत्येक नागरिकाचे हक्क, अधिकार आणि कर्तव्य नमूद करणा-या बहुमोल अशा संविधानाचा आपण आदर केला पाहिजे. त्यातील तत्त्वे समजून घेतली पाहिजेत या उद्देशाने भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेच्या वतीने संविधान दिनी संविधान अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संविधान उद्देशिकेचे अभिवाचन करण्यात आले.

मोतीबागेत साज-या झालेल्या या कार्यक्रमास पुणे महानगर कार्यवाह श्री. सचिन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्कृती संवर्धन संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी प्रास्ताविक मांडले. कार्यवाह श्री. प्रसादराव खेडकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. सचिन भोसले यांनी आपल्या मनोगतामधून संविधानाचे महत्त्व विशद केले. कोषाध्यक्ष श्री. किरण गांधी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

विश्वस्त प्रकाश आठवले, अप्पा मणेरे, राजेंद्र वालेकर, हमालवाडा आरोग्य कोठीचे मुकादम श्री. दत्तात्रय बडंबे, सुशील दळवी, प्रशांत शिरसाट, रामू धनगर, राहुल सोनवणे आणि संघाचे अनेक ज्येष्ठ स्वयंसेवक कार्यक्रमास उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे