“कवितेवर बोलू काही”; डॉ. संजय पाचभाई
मले का करा लागते'? भाग 2
“कवितेवर बोलू काही”; डॉ. संजय पाचभाई
‘मले का करा लागते’? भाग 2
बयीण एका ताईले ईचारलं, तिनं आपले बहाणे सांगले अन् जाता जाता मायीच हजामत केली. मणे संजू दादा तूमी तरी नागपूरच्या बायरं कार्यक्रम रायला तं येता का? म्या गप बसलो बाप्पा. त्यायचं बी खरंस हाहे मना. आता मी माह्या दुसर्या ताईले इचारले, येता काजी नागपूरले आता तुमी मणान मी ताईलेच काऊण इचारतो. त्या मांगं लयी मोठं कारण हाहे जी. मले तं एकबी सख्खी बयीण नायी, एक सख्खी चुलत होती (आता होती मनतो) तेबी माह्यापरस फक्त एका घंट्यानं मोठी, माह्या बूड्डीले तिचं भारी कौतुक. तिच्या पोरायचं माह्या बूड्डीनं हागलं मूतलं साफ केलं एका चुलत नणंदेच्या पोराचेतं वरीस भर सी.बी.एस.ई. का काय मणते ते (मले लिवाले बी जोर लागला) त्या शाळेची वर्षभर फी भरली आणं सेवटाले का भेटलं? महाशिवरात्रीचे कंद..!!
तवापासून माही बूड्डी लयी तुटली मीबी तुटलो. पण मले या समूहात भू ताई भेटल्या.त्यायच्या कडूण मले रोज नवीन शब्द उधार घेता येते आणं मले ते वापस बी करा लागत नायी. कारण का मी शब्दाच्या बाबतीत लयी ‘भिकारी’ हाहो माह्या ताई लोकायले माही हालात माहीत हाहे मणून माया बिचार्यावर दया दाखवते. आता समजलं तुमाले का मी काऊण ताईले इचारतो मणलो.
आता हे ताई माह्या जुन्याच जिल्ह्याची, संजू दादा माहा बी जमते का नायी शंकास हाहे आता बोला. आता जेवडे यान तेवडे या बाप्पा माहा फायदास हाहे मले तूमच्या शब्दाची ऊदारी पचवता येईन. नुकसान तुमचंचच ‘मले का करा लागते’?
✍️मृद्गंध✍️
डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर
©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह





