Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनविदर्भसाहित्यगंध

एक होती कळी

सरला टाले राळेगाव यवतमाळ

0 6 0 5 0 3

 

एक होती कळी

एक होती कळी अंगणात पळणारी
हास्याच्या लाटेने आनंद देणारी
छोटी छोटी पाऊले , इवलेसे हात
बोबडे – बोबडे बोल तिचे परी ती घरात ॥

हळू हळू शिकू लागली स्वप्न पहायला
नभातील तऱ्यांसंगे गप्पा मारायला
खेळता खेळता तिला फूटले पंख
नवे जग शोधण्यास उडाली उत्तुंग ॥

म्हणाली ; आता मी कळी राहणार नाही
पंखांना माझ्या बंदिस्त ठेवणार नाही
वाऱ्याच्या झुळुकीशी करेन दोन हात
आपलाच सुगंध दरवळेन जगात ॥

पाहता पाहता कळी फुलात बदलली
फूलपाखरासंगे स्वच्छंद खेळू लागली
सुगंधात तिच्या सृष्टी न्हाऊ लागली
भ्रमरगान तिची ओळख बनली ॥

एक होती कळी स्वप्नांसंगे खेळणारी
उमलता – उमलता जगाला सुगंध देणारी

सरला टाले
राळेगाव यवतमाळ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे