आशा कामे यांना गीता दत्त इंटरनॅशनल ॲवाॅर्ड प्रदान
वसुधा नाईक पुणे प्रतिनिधी
आशा कामे यांना गीता दत्त इंटरनॅशनल ॲवाॅर्ड प्रदान
वसुधा नाईक पुणे प्रतिनिधी
पुणे : (दि 17) ज्येष्ठ गायिका आशा कामे यांना सा म्युझिकल इंटरनॅशनल संस्था, समर्पण आणि सांजभेट संस्थांतर्फे विश्वविख्यात शीळवादक, गायक आणि अभिनेते डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते नुकताच 2025 चा गीतादत्त इंटरनॅशनल ॲवाॅर्ड ‘जाहिररित्या प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्ष सौ. वसुधा नाईक होत्या.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी गीतादत्त यांच्या स्वर जीवनावर प्रकाशझोत टाकला. गीतादत्तच्या सुवर्णयुगाने चित्रपट गीत शौकिनांना भारावून टाकले. ‘वक्तने किया क्या हसी सितम, मेरा सुंदर सपना बीत गया,मेरा नाम चिन चिन चिन , ठंडी हवा काली घटा..’अशा अनेक गाण्यांनी रसिकांना वेड लावले, असे डाॅ.घाणेकर यांनी प्रतिपादन केले.
आशा कामे यांनी आयुष्यातील प्रतिकुलतेशी झगडत चित्रपट गीतांच्या सादरीकरणातून संगीताचा व्यासंग यशस्वीरित्या जतन करुन प्रदीर्घकाळ रसिकांना दिलासा दिल्याबद्दल त्यांना “गीतादत्त “यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी सांगितले. सातत्याने चित्रपट गीतांच्या सादरीकरणामुळेच माझ्या आयुष्यात दुर्दम्य आशावाद निर्माण झाल्याचे आशा कामे यांनी पुरस्काराविषयी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले. याप्रसंगी कुंदा नाईक यांचेही भाषण झाले.
निमंत्रक सारिका सासवडे यांनी अतिथी स्वागत केले. रजनी कुलकर्णी यांनी अतिथी परिचय करुन दिला. सांजभेट संस्थेच्या उपाध्यक्ष प्रिया दामले यांनी आभार मानले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग ,अंकुश शिर्के , अशोक चव्हाण , सुनील पुरोहित, पुरोहित,आदि विविथ क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डाॅ.विठ्ठल मुरकेवार, गणपत तरंगे, आनंद मानकर, दिव्या नाईक, अजया मुळीक, आदिंनी कार्यक्रमाचे संयोजन केले. स्वतःच्या आनंदासाठी प्रत्येकाने रोज किमान एक तरी गाणे गावे असे अध्यक्षीय समारोपात वसुधा नाईक यांनी सांगितले. कार्यक्रमाचे औचित्य साधून डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित विश्वविक्रमी डहाळी अनियतकालिकाच्या 673 आणि 674 व्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आशा कामे आणि डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी गीतादत्तची काही अजरामर गाण्यांची झलक ऐकवली.





