
0
4
0
9
0
3
सवित्री स्तवन
वंदन सावित्री तुला हे
सुबुद्धी सुशक्ती आम्हा दे || धृ ||
दीन- दुबळ्यांची तू माता
विद्येची तू आद्य देवता
विद्याभ्यास सकला असू दे ||१||
मुलामुलींचे विद्या मंदिर
समानतेचे हे सरोवर
कलावंत अन् गुणवंत होऊ दे ||२||
यशपुष्प हे तुझिया चरणी
अम्हा रमू दे तुझिया स्तवनी
स्फुर्तिदायिनी स्फुर्ति आता दे ||३||
भुमेश्वरी सातपुते (खोंडे)
ता. उमरेड जि. नागपूर
0
4
0
9
0
3





