
0
4
8
2
9
0
संवाद पूल
शिलेदार समूह एक
भव्य काव्य विद्यापीठ..
विभिन्न काव्य शैलींचे
मिळे इथे शिक्षण अवीट..
मुख्य प्रशासक,सहप्रशासक
परीक्षक सारेच कार्य निपुण
रात्रंदिवस त्यांच्या परिश्रमाने
समूहाला मिळे दिशा परिपूर्ण…
त्रिवेणी,चारोळी,हायकू,कविता
कितीतरी इथे काव्यांचे प्रकार..
साहित्यगंध आणि बिंधास्त चैनलने
शिलेदारांच्या लेखणीची वाढते धार…
भिन्न राज्य,प्रांतातील आम्ही
आलो शिलेदार एका छताखाली..
मराठी भाषेचे सक्षमीकरण हे
ध्यास टिळ्यापरी लावूनी कपाळी..
शिळेदार समूहाचे आम्ही शिलेदार
आत्मसात करतो काव्यज्ञान विपुल….
यंत्राच्या सहाय्याने कां होईना
बांधतो परस्परात मायेचे संवाद पूल…
मृदुला कांबळे
गोरेगांव -रायगड
0
4
8
2
9
0



