ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरपरभणीमराठवाडासाहित्यगंध
आईची थोरवी
नरेंद्र गंगाराम साबळे ता. गंगाखेड,जि. परभणी

0
5
1
6
5
1
आईची थोरवी
तू चंद्राची कोर… तू चांदण्याचा घोळ
तू नभाचा मोह… तू आकाशाचे गीत
पाय तोह्य;जमीनीवर जीव तोहा घरी
नोको -मान पान… नको हेवे -दावे…!
झग-मगाटीचा … मला आला विट…
झोपड़ीत सुख… पिल्येला ऊब मायची
नको ती धाव… नको तो भाव…
अंतरीची ममता बाळा पाई कासाविस
दूर देशातून ओढ… भुईकडं मन पळ
माय होनं किती आवघड मेलेवर कळ
भोगून यातना… गेले स्वर्गाच्या दारात
कुठे रमलं स्वर्ग; बाळा पाई तळमळ..!
नसे क्षणाचा विसावा;मायपण कठीन
म्हणूनच श्रीहारी वारंवार घेई आवतार
तुझी थोरवी मोठी;वाहू शब्दफुले
किती सुमनांची वाहुनी राखोळी
तोह्यातून माय कसा होऊ उतराई
तूच सांग… बरं आई सांग बरं बाई
नरेंद्र गंगाराम साबळे
ता. गंगाखेड,जि. परभणी
0
5
1
6
5
1



