
0
6
1
1
8
5
दिरंगाई
सरकारी काम अन्
महिनो महिने थांब
त्याचेच होते सहज
ज्याचे हात वर लांब.. //
जिथे तिथे दिरंगाई
सरळ नाहीत बोलत
चिरी मिरी शिवाय
फाईलच नाही हलत..//
लाच देणे घेणे गुन्हा
लावले जरी फलक
पुसला जातच नाही
हा भ्रष्टाचारी कलंक.. //
कामे व्हावीत वेळेत
सामान्यांची धडपड
संधीसाधू अधिकारी
यांची करी धरपकड..
थातूरमातूर कारणे
कोंडी करी दिरंगाई
हेलपाटे घालून इथे
गरजूंचा जीव जाई.. //
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
========
0
6
1
1
8
5



