0
4
8
2
9
3
सोनप्रहर
पूर्व क्षितिजावरून
सोनप्रहर देई चाहूल
सोनेरी रवी किरणांचे
वाजू लागले पाऊल.. //
लाल केशरी रंगांची
झाली मुक्त उधळण
जून्याच शृंगाररसाचे
दररोज भासे नवेपण.. //
जादूभरा किरणस्पर्श
चैतन्य कणाकणात
जागी होई जीवसृष्टी
हा उत्साह मनामनात.. //
लोप पावलीय निद्रा
हटू लागली मरगळ
भरू लागली श्वासात
प्रसन्नतेची धुंद दरवळ.. //
स्वर गुंजले भूपाळीचे
मंदिरी काकड आरती
सडा सारवण अंगणी
देव्हारी तेवल्या ज्योती..//
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
0
4
8
2
9
3



