0
4
8
2
9
0
संविधान
भारताचा सर्वोच्च कायदा
थोर जनक संविधानाचे
डॉ.आंबेडकर शिल्पकार
थोर लोकशाही भारताचे
घटनेला संविधान मान
एकात्मता हाच दिसे भाव
कायद्याचे राज्य सुरू झाले
सार्वभौम संसदेचा ठाव
आमचा अभिमान विश्वास
मान्य करु लोकांचा कायदा
घटनाकार संविधानाचा
हो भारताला झाला फायदा
हक्क कर्तव्य नागरिकांचे
धर्म समभाव लोकासाठी
आचार संहिता ही देशाची
मतदान अधिकारासाठी
न्याय स्वातंत्र्यता बंधुता
संविधानात हक्क मिळाला
लोकशाहीचा आधार सदा
संविधानात शिल्पकाराला
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
==========
0
4
8
2
9
0



