जि.प. उच्च प्रा.शा. केसलापूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात
प्रतिनिधी : अखिल रोडे
जि.प. उच्च प्रा.शा. केसलापूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात
पोलीस पाटील वर्षाताई डवरे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना वही, पेन भेट
प्रतिनिधी : अखिल रोडे
बिनधास्त न्यूज नेटवर्क
सिर्सी:- केसलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.महादेव इरुटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.गावातील इतर महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक देखील यामध्ये सहभागी झाले होते.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी डांबेल्स कवायत आणि संगीत कवायत सादर केले. शाळेत लंगडी, कबड्डी,100 मी धावणे, लांब उडी,चित्रकला स्पर्धा,बेडूक उडी,लिंबू चमचा यासारख्या सहशालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच इ 5 वी मधील विद्यार्थीनी मृणाली गजानन शास्त्रकार हिला आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देण्यासाठी केसलापूर गावच्या पोलीस पाटील वर्षाताई डवरे यांनी विद्यार्थ्यांना वही पेन भेट दिली.सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन खूप सुंदर पद्धतीने करण्यात आले होते.
महाराष्ट्राचा मराठी बाणा आणि मंगळागौर या गाण्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.शेवटी नाष्टा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव इरुटकर,उपाध्यक्ष माधुरीताई नेहारे, शिक्षणतज्ञ , सामाजिक कार्यात अग्रेसर गजानन डवरे तसेच सीर्सी येथील कल्पकता वाचनालयाचे तोलेश सर, आशिष सर युगा मॅडम आणि दिक्षा मॅडम उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक स्वाती काळे मॅडम यांनी केले.



