
0
5
1
7
8
7
तुझं असणं
तुझं असणं म्हणजे
शांत सरीचं गोड गाणं
दुपारी उन्हाच्या पाऱ्यात
थंड सावलीचं विसावणं
तुझं असणं म्हणजे
शब्दाविनाचं बोलणं
डोळ्यातून उमलणारं
नात्याचं कोमल फुलणं
तुझं असणं म्हणजे
रात्रीचं उजेडात रूपांतर
अंधारातही सापडणारं
आशेचं छोटंसं अंतर
तुझं असणं म्हणजे
श्वासात मिसळलेले गीत
जगणं सोपं करणारी
अनमोल प्रीत मनमीत
तुझं असणं असंच राहो
मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात
कारण तू असलीस की
आयुष्य जाईल आनंदात
बी एस गायकवाड
पालम,परभणी
0
5
1
7
8
7



