Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितापरभणीमराठवाडासाहित्यगंध

श्वासोत्सव

बी एस गायकवाड पालम, परभणी

0 4 8 2 8 4

श्वासोत्सव

निरोगी निरामय राहण्या
कपालभाती प्राणायाम,
करावा अनुलोम विलोम
योगासने आणि व्यायाम…

नित्यनेमाने प्रात:काळी
फिरावे भल्या सकाळी,
निसर्गाच्या सान्निध्यात
श्रवण करावी भूपाळी….

निसर्गाची किमया न्यारी
मुक्त उधळण ऑक्सीजन,
जाणून आहे तो मानवाचे
विसंबून असलेले जीवन…

निसर्गाचा समतोल राखू
करू नव्याने वृक्षारोपण,
वृक्षतोड होत आहे भरपूर
धोक्यात येईल हो जीवन…

बरसत आहे सरीवर सरी
हिरवा गालिचा अंथरला
अवनी ही नटली सजली
श्वासोत्सवा या रंग आला…

बी एस गायकवाड
पालम, परभणी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे