ई-पेपरकवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
वास्तवतेचा दाह
दत्ता काजळे 'ज्ञानाग्रज'

0
3
4
5
9
0
वास्तवतेचा दाह
कपोलकल्पित जगताना
आस मानव सत्याची धरी,
जाणितो जेंव्हा सर्वथा मिथ्या
यातनेनी होई शोककारी …!!१!!
वास्तवतेचा दाह सहन
करताना होई दमछाक,
सामोरे जाण्यासाठी सत्याला
राहत नाही कशाचा धाक …!!२!!
निश्चयाने अवलंबितो हा
मार्ग यशाचाच खडतर,
प्रयत्नांती यशोगाथा सिद्ध
होते जीवनात खरोखर…!!३!!
वास्तवाशी फिरवू नये पाठ
असावी सदाचाराची ओढ,
कर्मसाफल्याने फलश्रुती
मिळेलच फळ त्याचे गोड…!!४!!
दत्ता काजळे ‘ज्ञानाग्रज’
तुरोरी जि.धाराशिव
========
0
3
4
5
9
0