
0
4
8
2
9
7
ओढ्याची ओढ
शाळेच्या दिवसात आई
बाबा कुठे जाऊ देईना
फक्त अभ्यास,अभ्यास
खेळालाही जाता येईना
मग मी विचारी परीक्षा
कधी होणार आहे बाई
ओढा बघण्या मला झाली
आजोळी जाण्याची घाई
आठवणीतील मामाचे
गाव खुणावे मजला
तेथील ओढ्याची ओढ
लावे मज घडीघडीला
गाईगुरे,पक्षी, प्यायचे
निर्मळ ओढ्याच पाणी
पाखरांची होई किलबिल
गाई ती गोड मंजूळ गाणी
रस्त्याच्या कडेला होती
दुतर्फा घनदाट झाडी
रम्य निसर्गातून जाई
पायवाट ही नागमोडी
प्रतिमा नंदेश्वर
मूल जि चंद्रपूर
0
4
8
2
9
7



