
0
5
2
4
6
5
भोंदूबाबा
अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढून
भोंदूबाबा लोकांना फसवतात
अंगारे धुपारे कर्मकांड करून
अघोरी विद्या आहे भासवतात
लागू नका तयाच्या नादी तुम्ही
सांगून तुकोबा,ज्ञानोबा संतांनी
कीर्तन प्रवचन समाज प्रबोधन
कसे आले नाही जनाचे ध्यानी
पुरोगामी महाराष्ट्रात आमच्या
किती दिवस चालूच अंधश्रद्धा
फसवणूक होते लुटले जातात
असताना निर्मुलनाचा कायदा
नरेंद्र दाभोलकर,पानसरे यांना
संपवले गोळ्या घालून ही जरी
विचार तयांचे ते जिवंत आहेत
अनुकरण करून पहायचे तरी
गाडगेबाबा सांगून गेले किर्तनी
अंधश्रद्धा,बुवाबाजी,कर्मठपणा
अधोगती होते माणसाची याने
सद्सद विवेक ठेवा डोळसपणा
बी एस गायकवाड
ता.पालम, जि.परभणी
=======
0
5
2
4
6
5



