Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरसाहित्यगंध

मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 8 4

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : किलबिलाट📘*
*🔸मंगळवार : २४/ जून /२०२५🔸*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*किलबिलाट*

गजबजल्यात शाळा
सुरू झाला किलबिलाट
शाळेत येताच स्वागत
पहा आमचा थाटमाट

ओस पडल्यागत कशा
सुट्टीतील शाळा इमारती
आमच्या मुळे फुलतात
आम्ही भलतेच करामती

टन टन घंटा वाजली
धाव धाव गर्दी जमली
उन्हाळ्याच्या सुट्यानंतर
मित्रमैत्रिणी भेट जाहली

गप्पा मारल्या मनसोक्त
मज्जा मामाच्या गावाची
रानावनात फिरण्याची
ओढयात मस्त पोहण्याची

पुष्पगुच्छ देऊन स्वागत
बोलका झालाया फळा
झाला किलबिलाट सुरू
गहिवरून आली शाळा

*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📗✍️📗➿➿➿
*किलबिलाट*

झाली झुंजुमुंजु पहाट
मुलांनी घातला घाट
पाहू लागले वाट
आली चिमण्यांची लाट ॥१॥

मांडला पाट
खाऊ ठेवला त्यावर
केला चिमण्यांचा थाट
मारली झडप खाऊवर ॥२॥

चिमण्यांचा किलबिलाट
पाहून वाटे गंमत
किती हा थाटमाट
करू या जंमत ॥३॥

एक चिमणी उडून
झाडावर बसली
केला किलबिलाट
चिवचिव गाऊ लागली ॥४॥

उसळली हास्याची लकेर
भरले दोस्तांचे मेळे
पळत आले सगळे
घातले गळ्यातगळे ॥५॥

झाली सर्वांची भेट
केला त्यांनी किलबिलाट
जवळ आले थेट
राहीले गुण्यागोविंदाने नीट ॥६॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📗✍️📗➿➿➿➿
*किलबिलाट*

जमली सारी मुले
शाळेच्या प्रांगणात
शाळा जाहल्या सुरू
आनंद नी उत्साहात

झाल्या भेटीगोठी
गप्पांना आला उत
सुटीनंतर प्रथमच
बोलायला सर्व उत्सुक

सुरू झाला शाळेत
मुलांचा किलबिलाट
गजबजून गेली
शाळेत जाणारी वाट

सर्व शिक्षक वृंदानी
केले विद्यार्थ्यांचे स्वागत
चहुकडे आनंदीआनंद
गप्पांना आली रंगत

टेबल,फळा,बेंच सर्व
झाले अगदी स्वच्छ स्वच्छ
किलबिलाटाने परिसर
झाला सर्वत्र भरगच्च

चैतन्यमयी शाळा
चैतन्यमयी वातावरण
ज्ञानोपासना मंदिरात
करती सर्व ज्ञानग्रहण

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📗✍️📗➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*किलबिलाट*
( बालकविता )

घंटा वाजली शाळेची
धावपळ झाली मुलांची
गजबजलेल्या शाळांची
तयारी सुरू स्वागताची…१

घेण्या प्रवेश वर्ग पहिला
होई स्वागत नवोगतांचे
लाजरे बुजरे चेहरे नवीन
दिसे दारी चिमुकल्यांचे…२

टाकले पहिले पाऊल
आज शाळेच्या दारी
रड बोंबल झाली सुरू
म्हणे जायचे मला घरी…३

गुलाबपुष्प देऊन
स्वागत केले मुलांचे
औक्षण करून साऱ्या
हाती ओझे पुस्तकांचे…४

रोज दिसतो शाळेत
मुलांचा किलबिलाट
नवा ड्रेस नवीन बूट
दिसे छान थाटमाट…५

बडबड गीत शिकविले
वर्गात मध्ये पहिलीच्या
केळी बागा पिकलेल्या
राहिल्या गावाला मामाच्या..६

छोटेसे बहीण भाऊ
आम्ही रोज शाळेत येऊ
गोष्टी गाणी बडबडगीत
आनंदाने रोजचं गाऊ…७

*सौ.माधुरी शेवाळे,पाटील*
*जिल्हा- नाशिक*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📗✍️📗➿➿➿➿
*किलबिलाट*

बंद होती खिडक्या दार
मुले मोबाइल मध्ये होती दंग
तेवढेच विश्व त्यांचे अन
तेवढेच त्यांच्या सृष्टीचे रंग

कुठे दिसेना खेळ मैदानी
अन तो दूर मातीचा गंध
कसे ओळखावे या पिढीने
सांगा आपापले भाऊबंद

सुट्या संपल्या आता
शाळेची झाली चाहूल
नवे दफ्तर घेवून पाठीशी
वळले तिकडे पाउल

रुसला होता फळा आजवर
छान अक्षर त्यावर फुलले
किती दिवसानी मुले येवून
त्या अक्षर झुल्यावर झूलले

जुनी किलबिलाट ओळखीची
त्या वर्गखोलीलाही झाला आनंद
जसे रंगीबेरंगी दिसे फुलपाखरू
अनूभवला सार्‍यांनी स्वरानंद

*✍️मृद्गंध✍️*
*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर.
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📗✍️📗➿➿➿➿
➿➿➿➿📗✍️📗➿➿➿➿
*किलबिलाट*

दाणा,पाणी घालते
या पाखरांनो या
आनंदाने राहाया
अंगणी माझ्या या

झाड लावले पेरूचे
पेरू खायला या
गोडगोड दाडिंब
दाणे खायला या

माझ्या दारात शेवगा
घरटी बांधा त्यावर
पिल्ली ठेवा सुरक्षित
पाऊस आल्यावर

चिमणी, सुगरण, सुतार
पक्षी तुम्ही छान छान
फिरका तुम्ही गावाकडे
ओसाड झाले सारे रान

किलबिलाट तुमचा कानी
होईल भारी मज आनंद
सुखाने राहा माझ्या अंगणी
उडा बागडा तुम्ही स्वच्छंद

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📗✍️📗➿➿➿➿
*किलबिलाट*

बंद होता शाळा
ओस पडले चोहीकडे
एकही जवळी ना आली
आज छोटी चिमणपाखरे ।।

घनघन घंटिचा नाद
ना दूमदूमला अवती भवती
प्रार्थना,बडबडगीत
ना पडले कानावरती ।।

रहावेना आज इथे
कासाविस होई मन
संपूर्ण दीर्घ अवकाश….
वाटे निरस झाले.. जीवन ।।

कसाबसा लोटला हा
दीर्घकाळ अवकाशाचा
घनघन वाजली घंटा…….
किलबिलाट झाला बालकांचा ।।

हास्याची लकीर चेहर्‍यावरती
पाहून आनंदले शाळामन…
बोलका झाला फळा अन्
नाचू लागले पटांगण ……।।

*कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📗✍️📗➿➿➿➿
*किलबिलाट*

आई तू झाड लाव
घालेन मी पाणी
पक्षी येतील राहायला
गातील किलबिल गाणी

झाडावरती भरेल
पक्षांची शाळा
आवाजाने त्यांच्या
गुंजेल अपुला वाडा

झाडावर बांधतील
घरटे त्यांचे छान
घरट्यातून पिल्ले
हळूच काढतील मान

चारा पाणी देण्यात
होईल अपुला खेळ
आनंदात जाईल बघ
तुझा माझा वेळ

तुझ्या आवाजाची मी
नाही बघणार वाट
येईल मला जाग
ऐकून किलबिलाट

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*© सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📗✍️📗➿➿➿➿
*किलबिलाट*

शिशिर ऋतूत
झोंबणारे वारे
शहारणारी थंडी
तनूस येती शहारे….

पानगळ झाली सुरू
दिसे फारच रूक्षता
फांदीवर दिसते
भयाण तिक्ष्णता…..

गोड चाहूल लागली
नवचैतन्याची,वसंताची
निसर्ग कवेत घेवून
गाणी गुणगुणण्याची…

गॅलरी मधे बसावे
कोकिळेचे गुंजन ऐकावे
वाफाळलेल्या चहासोबत
वर्तमानपत्र चाळावे….

पक्ष्यांचा किलबिलाट
चिऊताईचे अंगणी नाचणे
पारव्यांचे दाणे टिपणे
सृष्टीचे देणं सर्वाथाने जगणे…

सकाळची ही चाहूल
मनाला निर्भेळ आनंद देणारी
हाआनंद अनुभवण्यासाठी
निसर्गाच्या सानिध्यात वसुधा रमणारी…

*वसुधा वैभव नाईक* *धनकवडी, जिल्हा- पुणे*
*©सदस्या मराठीच्या शिलदार समूह*
➿➿➿➿📗✍️📗➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे