न्यु मून शाळेत शिक्षकदिन व बालिका सुरक्षा दिन उत्साहात
तारका रूखमोडे, जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
न्यु मून शाळेत शिक्षकदिन व बालिका सुरक्षा दिन उत्साहात
ॳॅडव्होकेट प्रांजली भांडारकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन
तारका रूखमोडे, जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
अर्जुनी मोरगाव :स्थानिक न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल तथा सायन्स ज्युनिअर कॉलेजमध्ये माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन तथा साक्षरता सप्ताह याचे औचित्य साधून बालिका सुरक्षा दिन सचिव ओमप्रकाशसिंह पवार, प्रा.राकेश उंदिरवाडे,प्रा.तारका रुखमोडे, ॳॅड. प्रांजली भांडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनानिमित्त शाळेत स्वयंशासनाचं परियोजन करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत वावरून शाळेचे संपूर्ण कामकाज व्यवस्थितरित्या जबाबदारीपूर्वक हाताळून या दिनाचा आनंद घेतला.शिक्षकाच्या भूमिकेत वावरताना विद्यार्थ्यांनी विविध विषय वर्गात शिकवले.मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थी रूपातील शिक्षकांचे स्वागत तथा अभिनंदन करण्यात आले. प्रा. राकेश उंदीरवाडे यांनी मुलांना मार्गदर्शन करतांना आदर्श गुरु -शिष्य परंपरा जपण्याचे आवाहन केले.
तसेच या दिवसाच्या सन्मानार्थ ..
कायद्याची अधिक माहिती मुलींना व्हावी म्हणून बालिका सुरक्षतिततेसाठी ॲडव्होकेट प्रांजली भांडारकर यांच्या मार्गदर्शनीय व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. ‘स्त्री’ या शब्दाची व्याप्ती तथा मुलींना स्वतःच्या हक्काप्रती लढण्यासाठी कायदयाची विविध कलमे त्यांनी आपल्या व्याख्यानातून स्पष्ट केली. तसेच कायद्याचा अधिकाराचा वापर करून स्वतःची सुरक्षा कशी बाळगायची याचे मौलिक मार्गदर्शन त्यांनी केले. मुलींनी अतिशय उत्सुकतेने सर्व नियम, अधिकार, कायदे, कलम जाणून घेतले.
‘मुलींच्या सुरक्षिततेवर’आजच्या काळातही प्रश्नचिन्ह आहेतच. निर्भया तथा बदलापूर सारखे भयावह प्रसंग आजही घडतच आहेत.जरी देश प्रगतीपथावर असला तरीहीआपल्या मुलींप्रती लोकांची विचारसरणी अद्यापही मागासलेली आहे. त्यासाठी लोकांची मानसिकता बदलवण्यासाठी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तसेच अधिकारासाठी लढले पाहिजे असे आवाहन बालिका सुरक्षा दिन या कार्यक्रमाप्रसंगी प्रा.तारका रुखमोडे यांनी विद्यार्थीनींना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार त्रिवेणी थेर यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.





