मराठा सेवा संघातर्फे शिवराज्याभिषेक दिन समारोह संपन्न
ऑनलाईन पद्धतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
मराठा सेवा संघातर्फे शिवराज्याभिषेक दिन समारोह संपन्न
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
सिलवासा: मराठा सेवा संघ राष्ट्रीय ,कार्यकारणी तर्फे आज (दिनांक 8 जून ) 2024 रोजी संध्याकाळी ठीक सहा वाजता ऑनलाईन पद्धतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने आयोजित या कार्यक्रमात संपूर्ण देशातून सर्व प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय कक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष व इतर मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सदर कार्यक्रमासाठी खानदेश सुपुत्र व खानदेश साहित्य संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा मराठा सेवा संघ धुळे जिल्ह्याचे प्रवक्ते श्री प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी यांचे शिवराज्याभिषेक या विषयावरती व्याख्यान आयोजित केलेले होते.
सदर कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक शिवश्री डॉ. सोपान शिरसागर राष्ट्रीय कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ यांनी तर मार्गदर्शनपर आशीर्वचन शिवश्री प्रदीप पाटील राष्ट्रीय सचिव मराठा सेवा संघ यांनी प्रस्तुत केले.
प्रमुख व्याख्याते डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांचा परिचय पश्चिम भारत राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय पाटील यांनी दिला. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा इतिहास अतिशय सुंदर शब्दात विशद करून डॉक्टर सूर्यवंशी यांनी आजच्या काळात शिव विचारांची गरज आहे यावर भर दिला विशेष करून आजची तरुण पिढी शिवचरित्रातून अनेक बोध घेऊन आपले जीवन संपन्न करू शकते असे विचार मांडले.
कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन दादरा नगर हवेली जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सविता पाटील ठाकरे यांनी केले राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार साहेब यांनीही या सूत्रसंचालनाची प्रशंसा केली.
अध्यक्षीय भाषणात मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री कामाजी पवार सर यांनी प्रमुख व्याख्याते डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांचे कौतुक केले. व आजच्या बदलत्या परिस्थितीत शिव विचारांचे पाईक होण्याची गरज विशद केली. युगपुरुष श्री पुरुषोत्तम जी खेडेकर यांनी मराठा सेवा संघाचे लावलेले लहानसे बी आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचेही कौतुक केले. शेवटी आभार मराठा सेवा संघ दादरा नगर हवेली चे कार्यालयीन सचिव श्री प्रशांत ठाकरे यांनी मानले.





