Breaking
ई-पेपरनागपूरमहाराष्ट्र

अन्न व औषध विभाग मंत्र्याच्या निर्देशानुसार संयुक्त कारवाईची मोहीम राबविणार

नागपूर शहर प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

अन्न व औषध विभाग मंत्र्याच्या निर्देशानुसार संयुक्त कारवाईची मोहीम राबविणार

सह -आयुक्त अन्न व औषध प्रशासनचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतला आश्वासन

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर: (दि २१) सिलबंद नसलेले कॅन व जारमधून खुले पाण्याची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्याचे अन्न व औषधी विभाग मंत्री नरहरी झिरवाळ तसेच नागपूरचे पालकमंत्री यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मागणीनुसार अन्न व औषधी प्रशासन नागपूर विभागाचे सह-आयुक्त श्री कृष्णा जयपुरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिल्याचे अ.भा. ग्राहक पंचायत नागपूरच्या शिष्टमंडळाला यावेळी सांगितले.

महानगर पालिका व अन्न व औषध प्रशासन ही मोहीम संयुक्तपणे लवकरच राबवतील असे त्यांनी स्पष्ट केले. नुकतीच अखिल भारतीय ग्राहक पंचायत नागपूरच्या शिष्टमंडळाने अन्न व औषधी प्रशासन नागपूर विभागाचे सह-आयुक्त कृष्णा जयपुरकर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन तक्रारींचे निवेदन सादर केले, त्यावेळी श्री जयपूरकर यांनी वरीलप्रमाणे कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

लग्न समारंभा तसेच विविध कार्यक्रमात सिलबंद नसलेले कॅन व जारमधून खुले पाणी सर्रासपणे पुरविले जात असून, कॅन व जारमधून पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचे कुठल्याही प्रकारचे परिक्षण किंवा तपासणी केली जात नसल्याने असे पाणी मानवी आरोग्यास अपायकारक असल्यामुळे यावर त्वरित बंदी घालण्यात यावी तसेच संबंधित व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्याची मागणी अ.भा. ग्राहक पंचायतने वारंवार उचलून धरली होती, त्याची दखल घेऊन उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत यांनी अन्न व औषधी विभाग मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांचेसोबत मंत्रालयात मिटींग घेऊन सिलबंद नसलेले कॅन व जारमधून खुले पाण्याचे विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर त्वरित कारवाईची मागणी केली त्यानुसार महाराष्ट्र शासनाचे अन्न व औषधी विभागमंत्री नरहरी झिरवाळ यांन सर्व संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले याकडेही अ.भा. ग्राहक पंचायतने लक्ष वेधले आहे.

यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत नागपूरच्या शिष्टमंडळाने इतर विविध विषयांवर चर्चा केली. रेल नीर चे पॅकेज ड्रिकींग वापरची कारवाई करण्याचे अधिकार रेल्वेचे अन्न सुरक्षा अधिकारी यांना आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बाजारात मिळणाऱ्या मिठाईवर बेस्ट बिफोरची अट नसल्याने त्यावर काही करता येत नाही असे सांगितले. खाद्य तेलातील भेसळीबाबत नमुने घेतले जातात व मोठया प्रमाणात जप्तीची कारवाई केली जाते. तेलाचे बील न देणाऱ्यांवर कारवाईची मोहीम तीव्रपणे राबविली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. तळणीचे तेल वारंवार वापरणाऱ्यांवर कारवाई करतांना काही ठिकाणी ते जागेवरच नष्ट केले जाते त्याची मोहीम परत एकदा राबविली जाईल. फळे पिकविण्याकरीता इथील गॅस लीक्वीडचा वापर करण्यास परवानगी आहे. त्याचा वापर करुन केळी, आंबे व अन्य फळे पिकविली जातात असेही त्यांनी याबाबत सांगितले.

बाजारात सर्रास खुले विकले जाणारे तीखट, हळद, धने पावडर मधील भेसळी बाबत तपासणी करण्यात येईल असे त्यांनी याबाबत विचारले असता सांगितले. शिष्टमंडळात अ.भा. ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गजानन पांडे, विदर्भ प्रांत कोषाध्यक्ष तथा नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष संजय धर्माधिकारी, नागपूर महानगर सचिव राजीव पुसदेकर, सहसचिव समीर जोशी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. असे कार्याध्यक्ष संजय धर्माधिकारी यांनी माहिती दिली.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे