जि.प. उच्च प्राथ. शाळा, भोजापूर येथे वृक्षारोपणाने गुरूपौर्णिमा साजरी
पवनी प्रतिनिधी

जि.प. उच्च प्राथ. शाळा, भोजापूर येथे वृक्षारोपणाने गुरूपौर्णिमा साजरी
शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह दिला ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश
भोजापूर, प्रतिनिधी : (दि २९ जुलै) जि.प. उच्च प्राथमिक शाळा, भोजापूर येथे गुरूपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक प्रवीण पडवाल व सहशिक्षक राहुल पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमात मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश देत प्रत्येकाने लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची शपथ घेतली.
यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुरूपौर्णिमेचे महत्त्व सांगतानाच पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षसंवर्धनाची गरज अधोरेखित केली. वृक्षारोपणासोबतच स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यातही अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.



