0
4
8
2
9
7
अलवार तुझी चाहूल
अलवार तुझी चाहूल
का मना घालिते भूल
जसे डहाळीवरचे फूल
मनी गंधाचे दरवळ
तव रुपाचा चांदवा
मनगर्भी उजळत आला
तुझ्या मोहकशा अदांना
चित चकोर फितूर झाला
सांजरंग नभांतरीचे
तव वदनावरी सजले
तव एक कटाक्षासाठी
मन आतुर आतुर झाले
स्वप्नची तू विधात्याचे
सत्यात आकारा आले
तव गालावरचे गोंदण
मन माझे तिथेच रमले
ते शब्द तव मुखीचे
जणू मधाची पोळी
तव गात्रातून वाहते
यौवनाची नशा आगळी
तव वाटेवरी पसरली
माझ्या प्रीतीची फुले
तुझ्या वाटेचे शतदा
सखे औक्षण मी केले
होशील माझी राणी
तो सुदिनची असेल
मग स्वर्गची अवघा
धरेवरी अवतरेल
वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली
==========
0
4
8
2
9
7



