0
4
8
2
9
7
हिरवा शृंगार
शालू हिरवा नेसून
करी शृंगार धरणी
मेघ दाटले अंबरी
जल वाहते चरणी
बीज धरेच्या कुशीत
अंकुरले कोंब छान
मन आनंदाने डोले
गर्भ पोटात हा सान
नयनात दाटे सुख
पाहे हिरवा शृंगार
शिवारात पिक डोले
जस बाळं अलवार
नदी,नाले उफाळून
वाहू लागले वेगात
कुस धरणीची आता
उजवली आनंदात
शेती,पठार,पर्वत
दिसे हिरवे हिरवे
डोळे हर्षाने हे तृप्त
पाहुनिया रूप नवे
सुलोचना लडवे
अमरावती
============
0
4
8
2
9
7



