Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

पाचटातली दिवाळी

कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी रोड, नागपूर

0 6 5 6 0 5

पाचटातली दिवाळी

जालना जिल्ह्य़ातील पाचटातली ऊसतोड कामगाराची दिवाळी ऐन दिवाळीत ना फटाके ना कपडे दिवसभर फडात राबायचं होय. पाचटातली दिवाळीत ऊसतोड मजूर आपले गाव सोडून कुंटुबासोबत ऊस मालकाचा फोन आल्यावर लगबगीने बैलगाडीतून दोन बैल,पत्नी व मुलांसोबत मजुर कामगार सकाळीच निघतो.तिथे पोहचल्यावर सगळेच मजूर आपला बिराड थाटतात,बैलांना सोईस्कर ठिकाणी बांधतात.पत्नी कुठेतरी विटाच्या चुलीची सोय करते.

आमच्या पिढ्या ऊसतोडवरच जगणार, कामगारांस कामाचा मोबदला मिळत नाही.2 टणाला 400 रुपये,मुलांचे शिक्षण म्हणजे शाळेत नाव दाखल पण तो शाळेत जात नाही. शिक्षणापासून दूर,कसला अभ्यास नायं जमलचं तर आईबाबाना मदत. दिवाळीत गोड धोड मुळीच नाही,चटणी भाकरी खायची, फडातच जगायचं. मजूर वर्ग दिवसभराच्या कामानंतर थकून आल्यानंतर शर्ट पॅन्ट कपडे धुणे वाळल्यानंतर तेच सकाळी घालणे बैलाच शेण उचलन हेच यांच उटण, महिला ऊसतोड कामगार म्हणतात दिवाळीत गोड धोड मुळीच नाही मुलं नवीन कपडे, फटाके याकरीता आग्रह करीत नाहीत.

सकाळी 4 वाजता उठायचं 3 वेळाचं स्वयंपाक करायचा पुरूष तोपर्यंत बैलाला वैरण देतात.सकाळी 6 वाजता फडात जायचं, सकाळचे दुपारी, व रात्री हेच जेवण, आपण घरात सिरीज लावतो,फटाके फोडतो पण हे सर्व ऊसतोड कामगाच्या मुलांना हे सुख कधीच पाहायाला मिळत नाही.आई गावात असल्यामुळे मजुर आपल्या आईसोबत फोनवरच बोलतो.परिस्थिती कितीही कठीण असो आनंदी राहायचं कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही.अशीही त्याची व्यथा.

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 5 6 0 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे