Breaking
कवितानागपूरभंडारामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

ये श्रावणा

वनिता गभणे आसगाव जि.भंडारा

0 4 8 3 0 0

ये श्रावणा

आषाढ परतीचा ईथे रचला आहे घाट..
ये रे ये श्रावणा आता तुझीच वाट. ||धृ||

हिरवाईचा चोपडा आचल,
वाट बघते वसुंधरा
आचलावर करायचं, नक्षीकाम दाट..
सुमनकुंचला घेऊन ये रे ये श्रावणा आता तुझीच वाट… ||१||
हिरवे हिरवे पाते डोलते
झुलते शेतशिवार सारा
त्या शेतांना हवी आता मोत्याची गाठ..
मोत्याचे दाणे घेऊन ये रे ये श्रावणा आता तुझीच वाट.. ||२||
राबून -राबून थकला
आता बळीराजा माझा
विश्रांतीला जोड, हवा गोडधोडाचा ताट.
सन-त्योहार घेऊन ये रे ये श्रावणा आता तुझीच वाट.. ||३||
सासुरवाशीण मनाला
लागली माहेरची आस
राखीची वाट पाहतो भावाचा हात
राखीचा सन घेऊन ये रे ये श्रावणा आता तुझीच वाट.. ||४||
बळीराजाच्या संगतीत राबतो
ढवळ्यापवळ्या दिनरात
त्यालाही मिरवू दे एकदिसाचा थाट
सन पोळ्याचा घेऊन ये रे ये श्रावणा आता तुझीच वाट.. ||५||
कुठे बरसला धो-धो तो
कुठे कोरडा दुष्काळ
त्या पावसाला दे आता लगामधाट..
रिमझिम सरी घेऊन ये रे ये श्रावणा आता तुझीच वाट.. ||६|

वनिता गभणे
आसगाव जि.भंडारा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे