डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित 580 वा ‘डहाळी अंक’ प्रकाशित
वसुधा नाईक, पुणे
डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित 580 वा ‘डहाळी अंक’ प्रकाशित
वसुधा नाईक, पुणे
पुणे: (दि.२३) डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी अनितकालिकाच्या 580 व्या विश्वविक्रमी अंकाचे प्रकाशन भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग आणि भाजप महिला आघाडी, शहर उपाध्यक्ष शैलजा सोमण यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आला.
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय कीर्तिच्या शीळवादक अनघा सावनूर, वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्ष वसुधा नाईक, वर्ल्ड क्वीन बीज संस्थेच्या अध्यक्ष मधुकर्णिका उर्फ सारिका सासवडे, कवयित्री दीपाराणी गोसावी, युवा आघाडीच्या पदाधिकारी सुचेता प्रभुदेसाई आदि मान्यवर उपस्थित होते.
‘डाॅ.मधुसूदन घाणेकर’ यांचे संपादन आणि मानव धर्म श्रेष्ठ धर्म प्रसाराचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्य निश्चितच संपून विश्वालाच प्रेरणादायी आहे.’ असे प्रतिपादन श्रीनिवास तेलंग यांनी केले. आगामी काही दिवसातच डाॅ.मधुसूदन घाणेकर त्यांच्या ‘मधुउवाच ‘ ह्या 50 वा काव्यसंग्रह, हाहा ss हीही ss हूहू, कार्टून बुक, डहाळी ह्या अनियतकालिकाचा 600वा अंक प्रकाशित होणार असून त्या निमित्ताने डाॅ.मधुसूदन घाणेकर त्यांच्या चालता- बोलता -हिंडत्या फिरत्या अशा भारतासह 20 देशात गाजलेल्या एकपात्री कार्यक्रमाचा 81,000 वा प्रयोग सादर करणार आहेत.
या निमित्ताने डिसेंबर2024 मधे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा जाहिर सत्कार करण्यासाठी ‘डाॅ.मधुसूदन घाणेकर सत्कार समिती स्थापन करण्यात आली असल्याचे माध्यम तज्ञ वसुधा नाईक यांनी कळवले आहे.





