जिल्हास्तरीय ‘संविधान गौरव’ स्पर्धा परीक्षेचे आयोजन
पर्यवेक्षक सुधा मेश्राम यांची उत्तम कामगीरी
जिल्हास्तरीय ‘संविधान गौरव’ स्पर्धा परीक्षेचे आयोजन
पर्यवेक्षक सुधा मेश्राम यांची उत्तम कामगीरी
तालुका प्रतिनिधी, अर्जुनी/ मोर
अर्जुनी/ मोर (दि.६): संविधान जागर अभियान अंतर्गत गोंदिया, यांनी आज दि. ०६/ १० / २०२४ ला ठिक १२:३० वाजता जि.प हाय. व ज्यु.कॉलेज अर्जुनी /मोर येथे संविधान गौरव प्रतियोगिता परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेत विद्यार्थीनी उत्सुकतापूर्ण भाग घेतला. या परीक्षेत विद्यालयातील ६४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संविधान गौरव प्रतियोगिता परिक्षा शांततेत आणि उत्साहात पार पडली.
विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागृती व्हावी आणि संविधानाचे महत्त्व लोकांना समजून त्याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी संविधान जागर अभियान गोंदिया,द्वारे दरवर्षी ही प्रतियोगिता संपूर्ण जिल्ह्यात घेतली जाते .अर्जुनी /मोरगाव येथील जि.प हायस्कूल येथे या परीक्षेचे केंद्रांचे नियोजन करण्यात आले होते. त्या केंद्राचे केंद्रसंचालक म्हणून विद्यालयाचे प्राचार्य. डब्लू.व्ही येरने सर यांनी मोलाचे सहकार्य केले . प्रा. अस्मिता मेश्राम मॅडम यांनी परीक्षेची जबाबदारी खांद्यावर घेऊन उत्तमरीत्या सहकार्य केले. प्रा. प्रियंका कांबळे मॅडम आणि मराठीचे शिलेदार समूहाच्या सहप्रशासिका, कवयित्री/लेखिका सुधा अश्वत्थामा मेश्राम यांनी परीक्षेचे पर्यवेक्षण केले.



