Breaking
कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडासाहित्यगंध

वटवृक्ष होतांना; मायादेवी गायकवाड

परभणी

0 4 8 2 9 4

वटवृक्ष होतांना

बाप पाहिला,घराचा
वटवृक्ष होतांना,
जबाबदारीचे ओझे
खांद्यावर, पेलताना.

संसार रथ,ओढताना
हसू सदा,मुखावर.
कळतो बाप,सर्वांना
जगातून,गेल्यावर.

हवे नको तें,विचारी
आणून देई, तात्काळ,
प्रेमानेअंजारी, गोंजारी
सरलाआता,तो सुकाळ.

सुख दुःखात,पाठीवर
आधार हाथ देताना,
मी आहे ना! विरले शब्द
पोरके तुम्हा शोधताना.

नजरेच्या धाकात, वाढलो
भीती होती, शिस्तीची,
आज घडलोत,तुम्हांमुळे
आस मायेच्या, स्पर्शाची.

अनमोल असें,मार्गदर्शन
अंतःकरणातून,करताना,
आयुष्याचे सार्थक झाले
अनुभव कथन ऐकताना.

पाहिले नाही,मी बापाला
कधीही हताश होताना,
परिस्थितीवर मात करून
पाहिले, यशोशीखरांवर चढताना.

मायादेवी गायकवाड
मानवत परभणी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे