
0
4
8
2
9
4
निष्पर्ण
आनंदाच्या उधाणास
भरते येते ना जेव्हा
जमतात सारे तेव्हा
सुख लुटण्यासाठी
जमलेले नेहमी नाही
राहत ,अल्पावधीतच
विखुरतात सर्व जण
स्मृती तरंगत ठेवून
माझं,माझे म्हणत मी
एकाकी होऊन जातो
पानं,फुलं,फळं माझे
एकाकीपण होई ताजे
जाणारे जाणारच सारे
अटळ हे नियतीचे वारे
एकट्याने कसे जगायचे
निष्पर्ण होऊन मरायचे…
अशा वेळी हाक येई
मग गहन गुढ मनाची
अंतर्मुख विचार धारा
मन मला देऊन जाई
चक्र फिरले सृष्टीचे
तर येतील परतून
सारे तुझे पर्ण फुले
तुझ्या राहतील सारे
प्रा.अर्चना कृष्णराव सुदामे
छत्रपती संभाजीनगर
=========
0
4
8
2
9
4



