जे.एस.एम. महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

जे.एस.एम. महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग/रायगड: (दि १५ एप्रिल) क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या १९९ व्या आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीदिनानिमित्त दिनांक ११ ते दि. १४ एप्रिल दरम्यान जे.एस.एम. महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी ठीक १० वाजता जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतम पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यामध्ये विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन जे.एस.एम. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात दि. ११ एप्रिल ते १४ एप्रिल यादरम्यान करण्यात आले.
दिनांक ११ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मा. ॲड. गौतम पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादनाने सदर उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. सामाजिक समता सप्ताहमध्ये विद्यार्थ्यांसाठी यावेळी अभ्यासपर्व उपक्रमाचे आयोजन ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत करण्यात आले होते.
महाविद्यालयातील ४५ विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवून दररोज ८ तास वाचनाने महामानवास अभिवादन केले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचे मानवमुक्तीचे कार्य ” या विषयावर महाविद्यालयात निबंधलेखन स्पर्धेचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले होते. सलग चार दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील विविध दर्जेदार ग्रंथांचे प्रदर्शन विद्यार्थी व शिक्षकांकरिता ग्रंथालयातील अभ्यासिकेत भरविण्यात आले होते.
अभ्यासपर्व उपक्रमाचे आयोजन ग्रंथालय व माहिती स्त्रोत केंद्र आणि मराठी भाषा व वाङमय अभ्यास मंडळ यांच्यावतीने यशस्वीरीत्या करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, प्र. प्राचार्य डॉ. नीलम हजारे विधी महाविद्यालय, उप प्राचार्य डॉ. प्रवीण गायकवाड, कनिष्ठ महाविद्यालय सुपरवायझर श्री.अजय सावंत ग्रंथपाल सुबोध दहाके तसेच अन्य प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



