Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

माय मराठी

नागोराव सोनकुसरे,

0 4 8 2 9 7

माय मराठी

माय मराठीची विण,
विण मराठी धाग्यांनी.
शब्द केले सुगंधित,
जाई जुईच्या फुलांनी….. १

प्रकाशित पुस्तकात,
ज्ञान मुक्ताई ज्ञानाची.
शब्द गुंफून मराठी,
शब्द माळ ज्ञानोबाची….. २

शब्द गुंफता धाग्यात,
माय मराठी भंडार.
शब्द वाचता मराठी,
मिळे आनंद अपार….. ३

माय मराठी शब्दात,
दिसे मला सुसंस्कृत.
रुक्मिणीच्या गळ्यातील,
सोनमाळ अलंकृत….. ४

होतो मराठी भाषेचा,
शब्द शब्दात सन्मान.
ज्ञानेश्वरी वाचताना,
वाटे आम्हा अभिमान…..५

भाषा दिनी मराठीला,
टाळ मृदंग वाजवू.
ओंजळीत फुले सम,
माय मराठी दाखवू….. ६

नागोराव सोनकुसरे,
नवीन नंदनवन नागपूर.
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे