त्रिभाषासूत्र धोरण निश्चिती समितीशी विभागीय व्हिडीओ काॅन्फरन्स संपन्न
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन

त्रिभाषासूत्र धोरण निश्चिती समितीशी विभागीय व्हिडीओ काॅन्फरन्स संपन्न
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नंदुरबार :दिनांक ११ नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथून त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष मा.नरेंद्र जाधव ज्येष्ठ साहित्यिक ,अभ्यासक यांचा संवाद कार्यक्रमात धुळे , जळगाव , नंदुरबार जिल्ह्यातील भाषा अभ्यासक , साहित्यिक , शिक्षण क्षेत्रातील तज्ञ , अधिकारी , विविध पदाधिकारी , समाजातील जाणकार, संस्था प्रतिनीधी, विचारवंत यांच्याशी व्हिडीओ काॅन्फरन्स द्वारे चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चिती करणेसाठी मा. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करणेत आलेल्या समितीचा नाशिक विभागीय दौरामध्ये आॅनलाइन दृश्य ( व्हिडीओ काॅन्फरन्स)प्रणाली द्वारे नंदुरबार जिल्हयातील शिक्षण क्षेत्रातील पदाधिकारी युनुस पठाण साहेब,डायटचे प्राचार्य डाॅ.रमेश चौधरी, अधिव्याख्याता विनोद लवांडे , प्रा.डॉ.माधव कदम साहित्यिक ,नंदुरबार जी.टी.पाटील महाविद्यालय नंदुरबार ,प्रा.डॅा राजेंद्र काकुस्ते अक्कलकुवा, श्री गणेश एन.पाटील (साहित्यिक/कवी)पर्यवेक्षक,वल्लभ विद्यामंदिर पाडळदा ता. शहादा येथून तसेच
प्रा.डाॅ.महेंद्र पाटील नवापूर , श्रीमती चंद्रलेखा भामरे , प्रा. सुनिता शिंदे , श्रीमती चेतना चावडा जळखे आदी अभ्यासक , विचारवंत , प्रतिनीधी , साहित्यिक विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांचेशी संवाद साधण्यात आला आणि त्रिभाषा धोरण संदर्भात विचारविनिमय करण्यात आला. या चर्चासत्रात नाशिक , धुळे,जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यातील सर्व तालुकातील प्रतिनिधी, अभ्यासक, साहित्यिक, विविध संस्थांचे पदाधिकारी , प्रतिनिधी आॅनलाईन व्हिडिओ काॅन्फरन्स ला उपस्थित होते.





