नगरपरिषद निवडणुकीत रायगड दंग
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

नगरपरिषद निवडणुकीत रायगड दंग
लेखक – बळवंत वालेकर
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
तीन – चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने नगरफरिसदाःचा नि वडणूक कार्यक्रम सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपःचायतींच्या निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान दि. २ डिसेंबर व निकाल दि. ३ डिसेंबरला जाहीर होईल. जिल्ह्यात अलिबाग , पेण , उरण , कर्जत , माथेरान खोपोली , रोहे , मुरुड – जंजिरा , श्रीवर्धन , व महाड या नगरपरिषदा आणि खालापूर , पाली , म्हसळा , तळा , माणगाव व पोलादपूर या नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे , जिल्ह्यात पनवेल ही एकमेवमहापालिका आसून ती निवडणूक महाराष्ट्रातील अन्य महापालिका़ंच्या निवडणूक प्रसंगी होईल .
अलिबाग ही रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयातील नगरपरिषद असून तिचे महत्त्व अन्यसाधारण आहे . जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य जिल्हास्तरीय कार्यालये येथे असल्यामुळे नगरपरिषदेचा कारभार गतिशील अस णे अपेक्षित असते . नगराध्यक्ष हे सन्मानाचे व महत्त्वाचे पद आहे . तर जिल्हा मुख्यालयातील पालिकेचे नगराध्यक्षपद हे विशेष महत्त्वाचे आहे . ही नगरपरिषद १८६४ साली स्थापन झाली . प्रारंभीच्याकाळात जिल्हाधिकारी
(अगर त्यांचा प्रतिनिधी ) कारभार पाहत असे. ब्रिटिशांनी भारतीयांना अंशतः स्वातंत्र्य दिल्यानंतर मोठे जमीनदार , , उद्योजक व उच्च शिक्षितांना काही अटीँवर मताधिकार दिला गेला. त्यानुसार १९११ साली निवडणूक होऊन जमशेटजी वामनजी यांना प्रथम नगराध्यक्षपदाची संधी मिळाली . अशाप्रकारे आजपर्यंत (प्रशासकीय काळ वगळता ) ३८ आसामींनी नगराध्यक्षपद भूषविले आहे . पैकी मुंबई राज्याचे माजी उपाध्यक्ष अॕड.
वामनराव लिमये , प्रसिद्ध ठेकेदार
रावसाहेब रामराव नथोबा नाईक, माजी आमदार अॕड.
भाऊसाहेब लेले ,माजी राज्यमंत्री अॕड. दत्ताजी खानविलकर यांची कारकीर्द विशेष सन्मानाची ठरली. तसेच खानविलकर यांच्ची लोकप्रियता व श्रीबाग( क्रमांक १ ते ३ ) योजना यशस्वी करुन अलिबाग शहराचा विस्तार केल्यामुळे त्यांना एकूण १६ व र्षे नगराध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली तर प्रसिद्ध ठेकेदार व दानशूर आसलेले रावसाहेब रामराव नथोबा नाईक यांनी व्ही.एन्. टिल्लू सर (इंडस्ट्रियल हायस्कूलचे तत्कालीन शिक्षक ) नगराध्यक्ष असताना (१९६३ साली ) अलिबाग बाजारपेठेतील मारुतीनाका ते जुनै भाजीमार्केट या रस्त्याचा ठेका घेऊन दर्जेदार काॕक्रिटीकरण केले ..सदर रस्ता ६२ वर्षानंतरही सुस्थितीत आहे . ( आजचे रस्ते एका पावसाच्या सरीने खड्डामय होतात . ) या क्रुतज्ञतेचा ओलावा नागरिकांच्या मनात टिकून आसल्यामुळे नाईक बंधूंना (रावसाहेब नाईक ते प्रशांत नाईक अशा ६ कुटुःबियांना) एकूण १४ वर्षे अलिबाग शहराच्या प्रथम नागरिकत्वाचा बहुमान दिला गेला. व अजूनही नाईक कुटुंबिया़ना अशी संधी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही .
नगराध्यक्ष व कालावधी
१)जमशेदजी वामनजी (१९११ ते१६
२) व्ही. के. वेबरी (१९१६ ते १९)
३) जेम्स बी. प्रेमरोज ( १९१९ ते २१)
४) व्ही. बी सप्रे (१९२१ ते २४)
५).डी. एस्. मणेरीकर(१९२४ ते २७)
६)एस्. जी, पेंडसे (१९२७ ते ३४)
७)खान बहाद्दूर महंमद १९३४ ते ३७)
८)वामनराव लिमये (१९३७ ते ४०)
९) रावसाहेब रामराव
नथोबा नाईक (१९४० ते ४२)
१०) टी. आर्. व्होरा (१९४२ ते ४३)
११)अनंतराव नाईक (१९४३ ते ४७)
१२)भाऊसाहेब लेले (१९४७ ते ४९)
१३)बःडूभाई म्हात्रे (१९४९ ते५२)
१४)व्ही. एन्. टिल्लू सर (५२ ते ५५)
१५)दत्ता खानविलकर ( ५५ते ५६,
१६) प्रशासक (१९५६ ते ५७)
१७) गोविंदराव वैद्य (१९६० ते ६१)
१८) तुळशीदास शेट (१९६१ ते ६६)
१९)डी. ए. राऊत (१९६६ ते६७)स
२०)दत्ता लेले (१९६८ ते ६९)
२१)डी. बी. जोशी (१९६९ ते ७०)
२२)प्रशासक (१९८१ ते ८५)
२३) जयंत केळुसकर (१९८५ ते ९१)
२४)सुधीर परांजपे ((८/८/८५ ते
१५ /८/ ८५)
२५)राजाराम डबरी २२७/[११/८६
दि. ११/ १२/ ८६)
२६)भाऊ जगे (२३/५/८७ ते
ते दि. १६/ १२/ १९९६)
२७) गजानन तांडेल – १४/८/९१
ते दि. १७/ ८/ ९१)
२८)ललिता काटकर(१०/१२/९६
ते १६/ १२/ ९७)
२९)विनीत मेहता – १७/१२/९७ ते
दि. ३१/३ /९८)
३०)प्रशासक -१/४/९८ ते२०/४/९८
३१)सतीष प्रधान -२१/४/९८ ते
१५/ १२/ ९८ )
३२)रामचंद्र नागे -१६/१२/९८ ते
दि.१६/ १२/ २००१)
श्रीम.सुनिता नाईक -१७/२२/२००१
ते दि. १७/ १२/ ००६
३४) प्रशासक (१७/१२/०६ ते
दि.२०/ १२/ ०६
३५) प्रशांत नाईक – – २०/ १२/ ०६ ते २५/९/०८, ६/१०/०८ ते १९/६/०९
३६)सौ.निलम हजारे – २६/९/० ८ ते
०५/ १०/०८,
३७)श्रीम. पार्वती मेंगाळ – ” दि.२०/०६/०९ ते २०/१२/२०११
३८) सौ.नमिता प्र. नाईक
२३/१२/२०११ दि. २०/०१/१३)
३९) श्रीम. सुरक्षा जगदीश शाह
(दि. २१/ १/ १३ ते २८/ १/ १३)
४०) सौ. नमिता प्रशांत नाईक
(२९/ १/ १३ ते १७/ ७/ १४)
४१) प्रशांत नाईक – दि १८/७/१४ ते प्रशासकीय राजवटी पर्यंत .





