Breaking
कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

सौदामिनी; वृंदा करमरकर

सांगली

0 4 8 2 9 7

सौदामिनी

वादळ वारे पिसाटले
सौदामिनीचे नृत्य रंगले
आभाळ करवंदी झाले
भान ढगांचे पुरते सुटले

तडतड तडतड वाजे ताशा
समीर धरे ताल जरासा
पर्जन्यफुलांची पखरण
कैफ मैफिलीचा हवासा

झरझर झरझर धारा झरती
सतारींना हे सूर गवसती
वातलहरी धुंद डोलती
गाल धरेचे जास्वंदी होती

वृक्ष-वेलींवर थेंबांची नक्षी
शहारले ओलेते पक्षी
ओली कळ्या फुले सजली
सोहळ्यास चपला ही साक्षी

भूराणी सुखावून गेली
कुशीत अंकुरांचा रुजवा
आनंदाच्या सरी ओघळती
साज धरेचा साजे हिरवा

हिरव्या रानी घुमे बासरी
संष्टीत चैतन्याच्या लहरी
मना भुलवी गाज सागरी
बळीच्या मनी हर्षाच्या सरी

निराशा गुंडाळे गाशा
पालवल्या हिरव्या आशा
मनी रुजव्याचा तेज कवडसा
पर्जन्याचा सोहळा असा

वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली जिल्हा सांगली
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे